राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न
श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने मतदार दिवस संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे व राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ नीता तिवारी व्यासपीठावर उपस्थित होते, राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त महाविद्यालयात ऑनलाईन निबंध स्पर्धेचा ही आयोजन करण्यात आला होता या निबंध स्पर्धेमध्ये 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ नीता तिवारी यांनी केले त्यांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याचा निवडणूक आयोगाच्या उद्देश आणि लोकशाही तर मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनी स्त्री-पुरुष घटकातील १८ वर्षाच्या वर असलेल्या प्रत्येक नागरिकांना आपले मतदारांचे उपयोग योग्य उमेदवार निवडताना केले पाहिजे असे आपले मत व्यक्त केले आणि राष्ट्रीय मतदान दिवसाची माहिती देऊन प्रतिज्ञा दिली त्यामध्ये आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर निष्ठा ठेवून याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशांचा लोकशाही परंपरा यांचे जतन करून आणि मुक्त निश पक्षातील व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य दाखवावा व प्रत्येक निवडणूक निर्भयपणे तसेच धर्म वंश जात समाज भाषा या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करून अशी शपथ घेण्यात आली याप्रसंगी डॉक्टर संगीता लोहकपुरे यांनी अध्यक्षीय भाषण देताना सांगितले निवडणूक प्रक्रियेत आपला नेता निवडताना मतदाराने विचारपूर्वक समाजाच्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याच्या वेध घेऊन मतदान करावे आणि मतदार नोंदणी साठी सहकार्य करावे असे आवाहन केले कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन कुमारी कल्याणी लुले तर आभार प्रदर्शन अमोल पाखरे यांनी केले निबंध स्पर्धेचे निकाल नंतर घोषित केले जाईल असी घोषणा करण्यात आली कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.