मातृभाषा दिवस साजरा!
श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी भाषा विभागाअंतर्गत आणि विद्यार्थी कल्याण विभागाअंतर्गत मातृभाषा दिवस साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे या उपस्थित होत्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक स्वाती फाले ह्या उपस्थित होत्या मराठी विभाग प्रमुख आणि विद्यार्थी कल्याण विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतामध्ये मातृभाषा ही मानवाला तर्कसंगत विचार आणि नवनव्या कल्पनांना जन्म देणारी एक अद्भुत देणगी असल्याचे सांगून मातृभाषा आहे. प्रत्येकाला प्रिय असणारी आणि आपल्या अस्तित्वाशी जोडली असल्याने मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.
मातृभाषेवर प्रत्येकाचेच प्रेम असल्यामुळे मातृभाषा ही आपल्या अस्तित्वाच्या खुणा प्रत्येक व्यक्तिमत्त्वामध्ये पेरत जात असल्यामुळे मातृभाषा अमर आहे असे सांगितले .कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक स्वाती फले यांनी मातृभाषेचे महत्त्व विशद करताना सांगितले की मातृभाषा दिवस हा एक सोपस्कार न राहता मातृभाषेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चा हा दिवस आहे. मातृभाषेविषयी ची कृतज्ञता प्रत्येकाच्या मनात असल्याशिवाय जगण्यासाठी उपयोगी असणाऱ्या इतर भाषा आम्हाला आत्मसात करता येणार नाहीत मातृभाषे सोबतच परकीय भाषाही आम्हाला शिकणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना मातृभाषा ही मानवाला आपल्या अस्तित्वा सह जगण्याचे भान देत असते मातृभाषे मुळेच प्रत्येक व्यक्ती भाषा समृद्धीकडे जाऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा समृद्ध आहे तो विद्यार्थी परकीय भाषांना आत्मसात करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून घेण्यासाठी सदैव तयार असतो म्हणून विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या मातृभाषेचा सखोल नि वैविध्यपूर्ण अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले .कार्यक्रमाचे संचालन गणेश आढाव यांनी केले .
आभार प्रदर्शन सुरेख इंगळे यांनी केले. याप्रसंगी कुमारी स्वेजल लखाडे हिने मातृभाषे विषयीचे आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित, प्राध्यापक डॉक्टर संतोष मिसाळ ,प्राध्यापक अमरीश गावंडे, प्राध्यापक राहुल घुगे यांच्यासह विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.