मराठी भाषा गौरव दिवस संपन्न!

श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी विभागाअंतर्गत मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे अध्यक्षस्थानी होत्या इंग्रजी विभाग प्रमुख प्राध्यापक राहुल घुगे यांच्यासह प्राध्यापक किरण इचे विचारपीठावर उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली .कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी केले मराठी भाषा ही तुमची आमचीसर्वांची मातृभाषा असते असलीतरी तरी तिचा शास्त्रशुद्ध आणि सखोल अभ्यास होणे आज काळाची गरज झाली आहे .

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकानेक रुख रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अनुवादित साहित्याच्या क्षेत्रात मराठीच्या विद्यार्थ्यांना अनेकानेक संधी खऱ्या अर्थाने आज उपलब्ध आहेत. करिता विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या संदर्भातील सर्व प्रकारची कौशल्य आत्मसात करून संधीचे सोने करावे असे सांगितले कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक राहुल घुगे यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी साहित्य जाणीवपूर्वक अभ्यासले पाहिजे आणि मराठी साहित्य मधल्या विविध साहित्य प्रवाहांचा अभ्यास करून मराठी भाषेचे सौष्ठव समजून घेतले पाहिजे .

आजची मराठी भाषा अतिशय समृद्ध पणे कुठल्याही परकीय भाषेच्या आक्रमणाला परतवून लावण्याची क्षमता बाळगून आहे .मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता विद्यार्थ्यांनी मराठी भाषेच्या शुद्धलेखन विषयक नियमांचे ज्ञान करून घेणे आवश्यक आहे मराठी भाषा आजच्या तरुणांना अनेक प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची क्षमता बाळगून आहे.

मराठीमधील वाचन कौशल्य लेखन कौशल्य ,संवाद कौशल्य मुद्रितशोधन जाहिरात लेखन ,अहवाल लेखन यांसारख्या उपयोजित मराठी भाषे संदर्भात असणाऱ्या निरनिराळ्या भाषिक क्षमतांचा अभ्यास करून प्रांतातील विविध प्रकारच्या रोजगारविषयक शैक्षणिक पात्रता धारण कराव्यात असे आवाहन केले .प्राध्यापक किरण इचे यांनी प्रारंभी विद्यार्थ्यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन महाराष्ट्र शासनाचे आभार मानले की शासनाने इयत्ता पहिलीपासून मराठी भाषा विषय अनिवार्य केला मराठी भाषेच्या विकासात खऱ्या अर्थाने आज तुम्हा सगळ्यांना प्रयत्नपूर्वक समृद्धता येण्याकरिता प्रयत्न करण्याची गरज आहे असे सांगितले .

मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाचे संचालन कु. दिपाली सोळंके हिने केले तर आभार प्रदर्शन गणेश आढाव यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित डॉक्टर नीता तिवारी ,डॉक्टर संतोष मिसाळ, प्राध्यापक अमरीश गावंडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.