जागतिक महिला दिवस संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यानाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून सौ. कोकिळा पाटील या उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहा पुरे उपस्थित होत्या मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा आढाव अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.नीता तिवारी यांचीही विचारपीठावर उपस्थिती होती. महाविद्यालयातील मराठी विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी आपली प्रास्ताविकपर भूमिका विशद करताना प्रा. रेखा आढाव यांनी महिला दिवस हा महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता समाजाने महिलांना उपलब्ध करून दिलेली सुवर्णसंधी असल्याचे मत व्यक्त केले. महिला दिनानिमित्त महिलांनी अधिक जबाबदारीने अधिक डोळसपणे आपला आत्मविश्वास वाढवून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करावा असे आवाहन केले .प्रमुख अतिथी आजच्या मार्गदर्शक सौ कोकिळा पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा अल्पसा परिचय आपल्या शब्दांमधून करून दिला. कार्यक्रम प्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्य आणि विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आले .

मार्गदर्शक कोकिळा पाटील यांनी विद्यार्थिनींना स्वावलंबी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आत्मसात करून आपले व्यक्तिमत्व बहुआयामी करावे असा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी त्यांना उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा सवलतींचा सदुपयोग करून अतिशय जबाबदारीने आपली भूमिका ओळखावी तसेच जिद्द ,चिकाटी आणि कठोर परिश्रम या त्रिसूत्रीच्या माध्यमातून आत्मसन्मानाने आपले जीवन अलंकारिक करावे असे आवाहन केले .आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. लोहकपुरे यांनी विद्यार्थिनींनी त्यांना उपलब्ध असलेल्या संधीचे सोने करावे असे सांगून विद्यार्थिनींनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील मरगळ झटकून टाकावी तसेच नवनवे कौशल्य आत्मसात करून आपल्या पूर्वज स्त्रियांनी महिलांच्या उन्नतीकरिता जे योगदान दिले त्या योगदानाचा विषयी सदैव ऋणी असावे” देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे “या कवितेतील आशय या प्रमाणे आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून महिलांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कुमारी चैताली नागे हिने केले .तर आभार प्रदर्शन कु. दिपाली सोळंके हिने केले .याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.