कौशल्य विकास योजना कार्यशाळा संपन्न
श्री धाबेकर कला महाविद्यालयात दिनांक 13/ 2/ 2020 ते 16/ 2/ 2020 यादरम्यान कौशल्य विकास योजना कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता लोहापुर होत्या .उद्घाटन प्रसंगी डॉ. ममता इंगोले यांचीही उपस्थिती होती. उद्घाटनाच्या सत्रा मध्ये प्रास्ताविक पर विचार व्यक्त करताना प्रा. रेखा आढाव यांनी कौशल विकास योजना कार्यशाळेच्या उपयोगीते विषयीची माहिती दिली.
अरे शाळेच्या प्रथम सत्राला मार्गदर्शक म्हणून डॉ.ममता इंगोले यांनी मोटिवेशन आणि गोल सेटिंग विषयावर विस्तारपूर्वक संवाद रूपाने मार्गदर्शन केले.
दिनांक 14 /3 2020 रोजी डॉ. हरिदास साखरे यांनी व्हर्बल कम्युनिकेशन नॉन हरबल कम्युनिकेशन आणि प्रेझेन्टेशन स्किल केली या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
15 2 2020 रोजी प्राध्यापक भावसार यांनी टाईम मॅनेजमेंट, ग्रुप डिस्कशन आणि रिज्यूमे रायटिंग या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद करून मार्गदर्शन केले.
दिनांक 16/ 2 /2019 रोजी डॉ ममता इंगोले यांनी विद्यार्थ्यांना इंटरव्यू स्किल्, कॅरेक्टर इथिक्स आणि मोरल या विषयावर अभ्यास पूर्ण मार्गदर्शन केले.
16/ 2 2020 रोजी दुपारी बारा ते दीड या दरम्यान डॉ.ममता इंगोले यांच्या उपस्थित समारोपीय सत्राचे आयोजन करण्यात आले. समारोपीय सत्राला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. संगीता लोहकरे यांच्यासह प्रा. रेखा आढाव यांची उपस्थिती होती. सदर कार्यशाळेला विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.